चांदण्यातला चंद्र माझा
चांदण्यात मी रात्रीच्या चंद्र माझा शोधत होतो
अंधारातल्या काजव्यांना ठाव त्याचा विचारत होतो
शोधता त्याला मी तो लाजून ढगाआड लपला होता
चोरून पाहण्याचा उगाच बहाणा त्याने शोधला होता
चांदण्या या रात्री झूकवून डोळे मुक होकार मला मिळाला होता
चंद्र हा माझा चाकोरीसह कलेकलेने प्रेमाला आकार देत होता
भेटण्याची ओढ त्यालाही पण भिती मनात दाटली होती
राहिलं ना भान स्वत:चे जेव्हा नजर दोघांची भिडली होती
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.