ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे । तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥

सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति गुरु आमुचे । न देखती भक्त ज्याचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥

ऐसे व्यक्त ऐकून । नामधारक बोले दीन । मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥

विश्व यंत्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त । हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥

तूं स्वछंदे वागसी । व्यर्थ देवा दोष देसीं । कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसीं राखी गुरु ॥५॥

एकदां तो कोपे जरी । न राखती हरहरी । येरु पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरुची ॥६॥

म्हणे सिद्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हे चरित । गोदावरीतीर स्थित । वेदधर्मशर्मा गुरु ॥७॥

तो स्वीय पातकान्त । करावया ये काशींत । तया दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥

सुहास्य मुखें सेवा करी । गुरु शिव्या देई मारी । न धरीं तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र ॥९॥

अंध पङगु गलत्कुष्ठी । गुरु झाला महाक्रष्टी । शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥

अपर्णापति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान । नाही गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥

त्याचा निश्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन । शिष्य बोले सर्व दान । देईल पूर्ण गुरु माझा ॥१२॥

निश्चय त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान । दे, गुरुही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥

हो अस्तंगत माया । गुरु प्रसन्न हो जया । भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥

इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते द्वितीयो


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel