गुरुंस भिक्षाद्याया आला । भास्कर विप्रसामग्रीला । तिघापुरति घेऊनी त्याला । भक्तीनेला प्रसादा ॥१॥

तो सर्व सामग्रीला । निजे घेऊनि उसेला । तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥

त्या हास्य करिती लोक । गुरु करविती पाक । म्हणती सांगे सर्व लोक । तो सांगे सर्वा भोजना ॥३॥

ते त्याचा बोला हंसती । कण वाटयान ये म्हणती । तें तो सांगे गुरुप्रती । बोलाविती तें त्यां सर्व ॥४॥

निरहंकार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न । गुरु वस्त्रें झांकवून । नेववून वाढविती ॥५॥

द्विज हृष्टचित्त जेविती । थोर सान सर्व येती । चार हजार झाली मिती । ते जेविती आकंठा ॥६॥

अन्न दिल्हें सर्व जातीला । आचंडालश्वकाकांला । तरी तोटा नाहीं आला । जेवविला गुरुनें विप्रा ॥७॥

अन्न संपेना तें जळीं । जलचरां दे त्या वेळीं । झाली ख्याती भूमंडळीं । वर त्यावेळीं देती विप्रा ॥८॥

हर्षुनियां वदती लोक । तिघांपुरतां होता पाक । जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे अन्नपूर्तिकरणं नाम अष्टत्रिंशं०


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel