किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः ।
इति विह्वलिता गेहानादायं मुसलं ययुः ॥१८॥
आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविले शठें ।
निजधाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥७४॥
काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण ।
चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥७५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.