कश्चिन्मत्स्योऽग्रसील्लोहं चूर्णानि तरलैस्ततः ।

उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन्किलैरकाः ॥२२॥

मत्स्यो गृहीतो मस्यघ्नैर्जालनास्यैः सहार्णवे ।

तस्योदरगतं लोहं स शल्ये लुब्धकोऽकरोत् ॥२३॥

समुद्रलाटांचे कल्लोळ । तेणें तें लोहचूर्ण सकळ ।

प्रभासीं लागोनि प्रबळ । उठिलें तत्काळ येरिकारुपें ॥८३॥

लोहकवळु मीन गिळी । त्या मीनातें समुद्रजळीं ।

अन्यत्र मत्स्यसहित जाळीं । मत्स्यघ्न आकळी निजलाघवें ॥८४॥

तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं ।

देखोनि हरिखला तो भारी । हें आंतुडे करीं तो सभाग्य ॥८५॥

मत्स्योदरींचें लोह जाण । त्याचें अचूक संधान ।

अगाध पारधी साधे पूर्ण । यालागीं तो बाण लुब्धकें केला ॥८६॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel