करभाजन उवाच-कृतं त्रेता द्वापरं च कलिरित्येषु केशवः ।

नानावर्णाभिधाकारो नानैव विधिनेज्यते ॥२०॥

नाना वर्ण नानाकारें । नाना नाम नानोपचारें ।

कृता-त्रेता-द्वापरें । भक्त निर्धारें केशवु यजिती ॥१२॥

'क'कार ब्रह्मा 'व'कार विष्णु । 'श'कार स्वयें त्रिनयनु ।

केशव तो गुणविहीनु । प्रकाश पूर्णु तिहींचा ॥१३॥

केशव केवळ अर्धमात्रा । न ये व्यक्ताव्यक्त उच्चारा ।

व्याप्येंवीण व्यापकु खरा । सबाह्याभ्यंतरा एकत्वें ॥१४॥

तोचि युगपरत्वें रूप नाम । भजनविधि क्रियाधर्म ।

भक्त पूजिती पुरुषोत्तम । तो अनुक्रम अवधारीं ॥१५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel