श्रीभगवानुवाच ।
यदूनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा ।
पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥३१॥
श्रीमुखें श्रीकांत । यदूचें भाग्य वर्णित ।
ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळू ॥१६॥
भगवद्भाग्यें भाग्यवंतू । यदूसी भेटला तो अवधूतू ।
त्यासी होऊनि अतिविनीतू । असे विनवितू निजहिता ॥१७॥
मृदू मंजुळ वचनीं प्रार्थिला । मघुपर्कविधानें पूजिला ।
अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥१८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.