यथा यथाऽऽत्मा परिमृज्यतेऽसौ । मत्पुण्यगाथाश्रवणाभिधानैः ।
तथा तथा पश्यति वस्तु सूक्ष्मं । चक्षुर्यथैवाञ्जनसम्प्रयुक्तम् ॥ २६ ॥
माझी प्रतिपाद्य स्वरूपता । नाना चरित्रें पवित्र कथा ।
तेथें श्रवणमननें चित्ता । प्रक्षाळितां कीर्तनें ॥४४॥
जंव जंव करी माझी भक्ती । तंव तंव अविद्यानिवृत्ती ।
तेणें माझे स्वरूपाची प्राप्ती । जे श्रुतिवेदांतीं अतर्क्य ॥४५॥
जें कां अतिसूक्ष्म निर्गुण । अलक्ष्य लक्षेना गहन ।
तेणें स्वरूपें होय संपन्न । जीव समाधान मद्भजनें ॥४६॥
नयनीं सूदल्या अंजन । देखे पृथ्वीगर्भींचें निधान ।
तेवीं मद्भजनें लाहोनि ज्ञान । चैतन्यघन जीव होय ॥४७॥
उद्धवा ऐक पां निश्चितीं । बहुत न लगे व्युत्पत्ती ।
जैसा भावो ज्याचे चित्तीं । तैशी प्राप्ती तो पावे ॥४८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.