चक्षुस्त्वष्टरि संयोज्य त्वष्टारमपि चक्षुषि ।
मां तत्र मनसा ध्यायन् विश्वं पश्यति सूक्ष्मदृक् ॥२०॥
सविता तो मी नारायण । ऐसें डोळ्यांमाजीं करी ध्यान ।
तेव्हां डोळाचि मद्रूप जाण । सविता आपण स्वयें होय ॥१३॥
एवं डोळा सविता हें माझे ध्यान । तिहींस एकात्मता झाल्या जाण ।
तेव्हां सूक्ष्मद्रष्टा होय आपण । जग संपूर्ण तो देखे ॥१४॥
बैसलेचि ठायीं जाण । चतुर्दशभुवनांचे दर्शन ।
एके काळें देख आपण । दूरदर्शन हे सिद्धी ॥१५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.