उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयमकृतात्मभिः ।

उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥२॥

मशकादि हिरण्यगर्भ पर्यंत । तूं सबाह्य सर्व भूतीं संतत ।

ऐशिया तूतें निश्चित । ब्राह्मण जाणत वेदार्थें ॥८४॥

आकळूनि उपनिषदर्थ । तुझ्या ठायीं भजनयुक्त ।

ते तुज सर्वगतातें जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥८५॥

त्या सर्वात्म्याचा पाहतां पार । अचिंत्यानंत ऐश्वर्यधर ।

त्या तुज नेणती प्राकृत नर । ऐक विचार तयांचा ॥८६॥

जे मनाचे विकिले । उपस्थाचे अंकिले ।

जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेनें केले घरजांवयी ॥८७॥

त्यांसी स्वतः सिद्ध स्वरूप पाहीं । सर्वगत न पडेचि ठायीं ।

निजात्मता न कळे देहीं । सदा विषयीं भूलले ॥८८॥

विषयीं चंचळ अंतःकरण । त्यांसी नव्हे ध्यान सगुण ।

निर्गुणीं प्रवेशेना मन । अज्ञान जन केवीं तरती ॥८९॥

न करितां नाना व्युत्पत्ती । न धरितां ध्यानस्थिती ।

तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या सांग निश्चितीं भजनासी ॥९०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel