श्रीभगवानुवाच ।

एवमेतदहं पृष्टः प्रश्नं प्रश्नविदां वर ।

युयुत्सुना विनशने सपत्नैरर्जुनेन वै ॥६॥

हाचि प्रश्न मजकारणें । पूर्वीं पुशिला अर्जुनें ।

जेव्हां तिरस्कारूनि दुर्योधनें । युद्ध सत्राणें मांडिलें ॥५॥

अरिनिर्दळणीं प्रतापपूर्ण । धीर वीर आणि सज्ञान ।

प्रश्नकर्त्यामाजीं विचक्षण । माझा आत्मा जाण अर्जुन ॥६॥

तेणें अर्जुनें कुरुक्षेत्रीं । युद्धसमयीं महामारी ।

स्वजनवधाचें भय भारी । हाचि प्रश्न करी मज तेव्हां ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel