हिरण्यगर्भो वेदानां मंत्राणां प्रणवस्त्रिवृत् ।

अक्षराणामकारोऽस्मि पदानि च्छन्दसामहम् ॥१२॥

वेद अध्यापक प्रसिद्ध । हिरण्यगर्भ मी म्हणे गोविंद ।

माझेनि जगीं अनुल्लंघ्य वेद । वेदवाद तोही मी ॥७१॥

ओंकारेवीण मंत्रश्रेणी । ते जाण बाळकाची कहाणी ।

मंत्रां ओंकार मी चक्रपाणी । सकळ मंत्र त्याचेनी पावन ॥७२॥

अकार उकार मकार । अर्धमात्रेसी उच्चार ।

या नांव 'त्रिविध ओंकार' । पावन मंत्र येणेंसीं ॥७३॥

अक्षरांच्या उच्चारासी । अकार लागला सर्वांसी ।

तो अकारू मी हृषीकेशी । जाण निश्चयेसी उद्धवा ॥७४॥

अक्षरीं अकार मी मुकुंदू । छंदामाजीं गायत्री छंदू ।

तो मी म्हणे गोविंदू । यालागीं ब्रह्मवंदू सेविती ॥७५॥

छंदामाजीं गायत्री छंद । सकळ द्वंद्वामाजीं निर्द्वंद्व ।

तो मी म्हणे गोविंद । द्विजवृंद येणेंचि मज ॥७६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel