ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणामहमर्जुनः ।
भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः ॥३५॥
ब्राह्मणभजनीं 'बळी'ची थोरी । तो मी कृष्ण म्हणे निर्धारीं ।
ब्राह्मणभजनप्रतापें करीं । मी बळीच्या द्वारीं द्वारपाळु ॥६३॥
नरावतारें अतिसंपन्न । पांडवांमाजी वीर 'अर्जुन' ।
तो मी म्हणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥६४॥
भूतांची 'उत्पत्ति-स्थिती' । तो मी म्हणे श्रीपती ।
भूतांसी जे 'प्रळयगती' । तेही मी निश्चिती उद्धवा ॥६५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.