तत्त्वं नः सर्वधर्मज्ञ धर्मस्त्वद्भक्तिलक्षणः ।
यथा यस्य विधीयेत तथा वर्णय मे प्रभो ॥७॥
तूं सर्वज्ञ ज्ञानमूर्ति । तरी मनुष्यांची कर्मगति ।
वर्णाश्रमांची धर्मस्थिती । यथानिगुतीं मज सांग ॥४६॥
वर्णबाह्याचें निजकर्म । तोही सांगावा विहित धर्म ।
उद्धवें प्रार्थिला पुरुषोत्तम । तेणें मेघश्याम तुष्टला ॥४७॥
सकळ जनांचा हितकर । उद्धवें प्रश्न केला सधर ।
तो ऐकोनि शुकयोगींद्र । आनंदनिर्भर तेणें प्रश्नें ॥४८॥
शुक्र म्हणे परीक्षितीसी । धन्य बुद्धी ते उद्धवासी ।
जेणें प्रार्थूनि हृषीकेशी । जाहला जगासी उपकारी ॥४९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.