गृहाश्रमो जघनतो ब्रह्मचर्यं हृदो मम ।

वक्षःस्थानात् वने वासो न्यासः शीर्षणि संस्थित ॥१४॥

`गृहास्थाश्रमासी' जघनस्थान । `ब्रह्मचर्य' माझ्या हृदयीं जाण ।

`वानप्रस्थासी' मी आपण । वाढवीं महिमान वक्षः स्थळीं ॥७९॥

चतुर्थाश्रम जो `संन्यास' । त्याचा माझे शिरीं रहिवास ।

एवं वर्णाश्रमविलास । तुज सावकाश सांगितला ॥८०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel