एवंवृत्तो गुरुकुले वसेद्भोगविवर्जितः ।
विद्या सामाप्यते यावद्बिभ्रद्व्रतमखण्डितम् ॥३०॥
सांडोनि सकळ भोगांतें । गुरुकुळीं राहोनि तेथें ।
गुरुसेवेचेनि व्रतें । प्रिय सर्वांतें तो जाहला ॥२४॥
एवं गुरुसेवायुक्त । धरोनियां अखंड व्रत ।
पावला वेदशास्त्र । पढणें समाप्त पैं जाहलें ॥२५॥
एवं विद्या जाहलिया समाप्त । उपकुर्वाण नैष्ठिक व्रत ।
स्वयें सांगावया अनंत । पुढिल श्लोकार्थ सांगतु ॥२६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.