अथानंतरमावेक्ष्यन्यथा जिज्ञासितागमः ।
गुरवे दक्षिणां दत्वा स्त्नायाद्गुर्वनुमोदितः ॥३७॥
संपूर्ण केलिया अध्ययन । जाहलिया वेदशास्त्रसंपन्न ।
तेणें गुरूसी आज्ञा पुसोन । व्रतविसर्जन सकामा ॥३७०॥
सकामनिष्कामतेचा भरु । देखोनि विवेकविचारु ।
तैशीच आज्ञा देती गुरु । जैसा अधिकारु शिष्याचा ॥७१॥
ज्यासी गृहश्रमाची आसक्ती । तेणें आपुल्या यथाशक्ती ।
दक्षिणा देऊनि गुरुप्रती । व्रतसमाप्ती करावी ॥७२॥
करावया समावर्तन । घेऊनि गुरूचें अनुमोदन ।
करावें मंगलस्नान । विसर्जन व्रतबंधा ॥७३॥
येथ अधिकाराचा भेदु । स्वयें सांगतो गोविंदु ।
तोचि श्लोकार्थे विशदु । वैराग्यसंबंधु अधिकारा ॥७४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.