इत्थं परिमृशन्मुक्तो गृहेष्वतिथिवद्वसन् ।

न गृहैरनुबध्येत निर्ममो निरहङ्‍कृतः ॥५४॥

ऐसेनि विवेकें विवेकवंता । कदा न बाधी मोहममता ।

अतिथीच्या परी सर्वथा । अनासक्तता गृहवासीं ॥३॥

एवं निर्मानमोहममता । जो उदासीन गृहावस्था ।

ज्यांसी निष्काम निर्लोभता । त्यासी अहंता बाधीना ॥४॥

निर्ममता निरभिमान । व्हावया मुख्य गुरुभजन ।

तेणें वैराग्य-विवेक-ज्ञान । सहजचि जाण गुरुभक्तां ॥५॥

ऐशिया वैराग्यविवेकस्थितीं । गृहीं वसतां गृहस्थाप्रती ।

प्राप्त होय निजमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६॥

आतां आश्रमांतराची गती । स्वयें सांगताहे लक्ष्मीपति ।

भक्ति विरक्ति निजशांती । आश्रमस्थितिविभाग ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel