तपस्तीर्थं जपो दानं पवित्राणीतरणि च ।
नालंकुर्वन्ति तां सिद्धिं या ज्ञानकल्या कृता ॥४॥
सकळ साधनां नव्हे जे शुद्धी । ते ज्ञानलेशें होय त्रिशुद्धी ।
ऐक उद्धवा सुबुद्धी । ते ज्ञानशुद्धीचा महिमा ॥५८॥
`तप' जें परार्क पंचाग्नी । `तीर्थ' गंगादि सविता त्रिवेणी ।
`जपु' जे नाना मंत्रश्रेणी । गो-भू-तिल `दानीं' सुवर्णादि ॥५९॥
आणिकही इतर `पवित्रें' । जें `स्वधर्मकर्मादि' स्वाचारें ।
नाना `याग' अग्निहोत्रें । पवित्रकरें अतिशुद्ध ॥६०॥
एवं तपादिक जें साधन । या सकळांची शुद्धी गहन ।
ते ज्ञानलेशासमान । पवित्रपण तुळेना ॥६१॥
ज्ञाननिष्ठा अर्धक्षणें । जे पवित्रता स्वयें लाहणें ।
तें तपादि नाना साधनें । नाहीं पावणें कल्पांतीं ॥६२॥
ऐसें जें `पवित्रज्ञान' । तें मुख्यत्वें धरोनि जाण ।
माझे करावें भजन । तेंचि निरूपण हरि बोले ॥६३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.