तानहं तेऽभिधास्यामि देवव्रतमुखाच्छ्रुतान् ।

ज्ञानवैराग्यविज्ञान श्रद्धाभक्त्युपबृंहितान् ॥१३॥

ते भीष्ममुखींचे मोक्षधर्म । म्यां परिशिले अतिउत्तम ।

जे निरसिती भवभ्रम । सकळ कर्मदाहक ॥६४॥

ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती ।

भीष्में सांगितली धर्माप्रती । ते मी निश्चितीं सांगेन ॥६५॥

म्हणणें भीष्मासी `देवव्रत' । तेणें देवावरी ठेवूनि चित्त ।

शरपंजरीं सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥६६॥

तेणें सांगितला मोक्षधर्म । त्यांत मुख्यत्वें `ज्ञान' प्रथम ।

तें ज्ञान सांगे पुरुषोत्तम । अतिउत्तम अवधारीं ॥६७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel