तस्मान्मद्भक्तियुक्तस्य, योगिनो वै मदात्मनः ।

न ज्ञानं न च वैराग्यं, प्रायः श्रेयो भवेदिह ॥३१॥

करुं नेणे कर्माचरण । न साधितां वैराग्यज्ञान ।

भावें करितां माझें भजन । माझ्या स्वरुपीं मन ठेवूनी ॥८७॥

तेथ ज्ञानकर्मादिकें जाण । मुख्य वैराग्यही आपण ।

मद्भक्तीसी येती लोटांगण । चरणां शरण पैं येती ॥८८॥

शरण येणें हें कायशी गोठी । केवळ जन्मती भक्तीच्या पोटीं ।

मग लडेवाळें घालूनि मिठी । स्वानंदाची गोमटी मागती गोडी ॥८९॥

एवं भक्ति आपुले अंकीं जाण । करी ज्ञानादिकांचे लालन ।

परमानंद पाजूनि पूर्ण । करी पालन निजांगें ॥३९०॥

ते आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानादिकें कामारी होती ।

तेचिविखींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥९१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel