स्नानदानतपोऽवस्थावीर्यसंस्कारकर्मभिः ।
मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरेद्द्विजः ॥१४॥
गर्भाधानादि अन्नप्राशन । ते बाल्यावस्था संपूर्ण ।
चौल तें कुमारावस्था जाण । ब्राह्मणपण उपनयनें ॥५१॥
कर्मभूमिकेलागीं स्नान । द्रव्यशुद्धीलागीं कीजे दान ।
वैराग्यलागीं तप जाण । कर्माचरण जडत्वत्यागा ॥५२॥
माझिया भजनीं दृढबुद्धि । त्या नांव जाण `वीर्यशुद्धि' ।
माझेनि स्मरणें `चित्तशुद्धि' । जाण त्रिशुद्धि उद्धवा ॥५३॥
ऐसऐसिया विधीं । ब्राह्मण जे कां सुबुद्धी ।
सबाह्य पावावया शुद्धी । वेद उपपादी स्वकर्में ॥५४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.