पुरुषः प्रकृतिव्यक्तमहङकारो नभोऽनिलः ।

ज्योतिरापः क्षितिरिति, तत्त्वान्युक्तानि मे नव ॥१४॥

श्रोत्रं त्वग्दर्शनं घ्राणो, जिव्हेति ज्ञानशक्तयः ।

वाक्पाण्युपस्थपाय्वङ्‌घ्रिः, कर्माण्यंगोमयं मनः ॥१५॥

प्रकृति पुरुष महत्तत्त्व । महाभूतें अहंभावं ।

अठ्ठाविसांत हीं तत्त्वें नव । इतर वैभव तें ऐक ॥४७॥

मुख्य ’ज्ञानेंद्रियें’ पांच जाण । पांच ’कर्मेंद्रियें’ आन ।

ज्ञानेंद्रियें ज्ञानेंद्रियांआधीन । स्वतां गमन त्यां नाहीं ॥४८॥

आंधळें पायीं चालों जाणे । पांगुळ केवळ देखणें ।

अंधें पंगू खांदीं घेणें । परी बोलें वर्तणें देखण्याचेनि ॥४९॥

तेवीं ज्ञानेंद्रियां कर्मेंद्रियांसी । संगती घडली असे तैशी ।

यालागीं मुख्यत्वें ज्ञानेंद्रियांसी । हृषीकेशी बोलिला ॥१५०॥

उभय इंद्रियां चाळक । तें मनचि गा एकलें एक ।

येणेंचि अकरा इंद्रियें देख । यदुनायक सांगत ॥५१॥

इंद्रियविषयनिरुपण । स्वयें सांगताहे नारायण ।

मुख्यत्वें विषय पांच जाण । तयाचें साधन गत्यादिक ॥५२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel