तन्ममाख्याहि गोविन्द दुर्विभाव्यमनात्मभिः ।

नह्येतत्प्राशयो लोके विद्वांसः सन्ति वञ्चिताः ॥३५॥

अभिनव हे तुझी गती । सर्वथा न कळे श्रीपती ।

मायामोहित जे चित्तीं । त्यां तुझी स्थिती नेणवे ॥१२॥

तूं आत्मा अद्वितीय अविनाश । तेथ उत्पत्ति स्थिति विनाश ।

नाथिला दाविसी भवभास । हा अतर्क्य विलास तर्केना ॥१३॥

येथ वेदाची युक्ती ठेली । उपनिषदें वेडावलीं ।

पुराणें मुकीं झालीं । अतियत्‍नें लक्षिली न वचेचि मागी ॥१४॥

तुझे केवळ कृपेवीण । तुझें इत्यंभूत नव्हे ज्ञान ।

ऐसे जढ मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥१५॥

तुझे योगमायेची अतर्क्यता । ब्रह्मा भुलविला वत्सें नेतां ।

शिवू भुलविला मोहनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥१६॥

प्रपंचीं अथवा परमार्थी । तुझेनि चालती इंद्रियवृत्ती ।

यालागीं गोविंदनामाची ख्याती । त्रिजगतीं वाखाणिली ॥१७॥

सादर कृपापूर्वक आपण । माझा सांगावा अतर्क्य प्रश्न ।

देहीं देहांतरा संचरण । जीवास जन्ममरण तें कैसें ॥१८॥

ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । हांसिन्नला मधुसूदन ।

हें अवघें मायिक जाण । कल्पनाविंदान मनोमय ॥१९॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel