अणुर्बृहत्कृशः स्थूलो यो यो भावः प्रसिध्यति ।
सर्वोऽप्युभयसंयुक्तः प्रक्रुत्या पुरुषेण च ॥१६॥
अणु म्हणिजे अतिसूक्ष्म सान । बृहत् म्हणिजे विशाळ जाण ।
कृश म्हणिजे किरकोळपण । स्थूळ तें पूर्ण जडावयवीं ॥५३॥
जें जें दृष्टिगोचर झालें । जें जें नांवरुपा आलें ।
तें तें उभययोगें केलें । जाण घडलें प्रकृतिपुरुषीं ॥५४॥
जें उभययोगसंभव । जग ऐसें ज्याचें नांव ।
तें प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥५५॥
या दोहींवेगळें निरवयव । जेथूनि या दोहींचा उद्भव ।
तेचि सद्वस्तु सर्वी सर्व । देवाधिदेव सांगत ॥५६॥;
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.