विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः ।
पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥२१॥
चतुर्दशभुवनेंसीं ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड ।
तें स्थितिकाळीं पाळूनि अंड । अंतीं नाशाचें बंड आदरी काळू ॥१८॥
तो तूं काळ म्हणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण ।
तेणें काळें म्यां प्रळयईक्षण । केलें जाण सृष्टीसी ॥१९॥
पंचभूताचे भिन्न भाग । काळसत्ता राखिले विभाग ।
ते सत्ता म्यां आवरितां सांग । खवळे लगबग पंचत्वासी ॥५२०॥
जैसा उत्पत्तीचा उपक्रमू । तैसाचि प्रळयाचा अनुक्रमू ।
भूतीं भूतलयो सुगमू । पुरुषोत्तमू सांगत ॥२१॥;
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.