पाद्यार्घ्याचमनीयार्थं त्रीणि पात्राणि देशिकः ।
हृदा शीर्ष्णाऽथ शिखया, गायत्र्या चाभिमन्त्रयेत् ॥२२॥
गुरुमंत्रदीक्षा जैसी ज्यासी । तोचि निजमार्ग शिष्यासी ।
तेणें पाद्यादि तिहीं पात्रांसी । संप्रदायेंसी मांडावें ॥७७॥
पाद्य द्यावें हृदयमंत्रें । अर्घ्य अर्पावें शिरोमंत्रें ।
आचमन द्यावें शिखामंत्रें । गुरुसंस्कारें आगमोक्त ॥७८॥
तेंचि तिनी पात्रें जाण । गायत्रीमंत्रें आपण ।
अभिमंत्रोनियां पूर्ण । देवार्पण करावीं ॥७९॥
गुरुसंप्रदाय नेटक । यालागीं त्यातें ’देशिक’ ।
स्वयें बोलिला यदुनायक । दीक्षाविवेक निजद्रष्टा ॥१८०॥
आगमशास्त्रींचा निजमार्ग । भूतशुद्धि प्राणप्रतिष्ठायोग ।
तेणेंचि अन्वयें श्रीरंग । श्र्लोकार्थें साङग सांगत ॥८१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
yashawant hire
फारच छान आहे