तप्तजाम्बूनदप्रख्यं, शङखचक्रगदाम्बुजैः ।
लसच्चतुर्भुजं शान्तं, पद्मकिञ्जल्कवाससम् ॥३८॥
स्फुरत्किरीटकटककटिसूत्रवराङगदम् ।
श्रीवत्सवक्षसं भ्राजत्, कौस्तुभं वनमालिनम् ॥३९॥
जैसी तत्पस्वर्णभा । तैशी मूर्तीची अंगप्रभा ।
चतुर्भुज साजिरी शोभा । चिन्मात्रगाभा साकार ॥१२॥
शंखचक्रगदाकमळ । कांसे पीतांबर सोज्ज्वळ ।
लोपूनि अग्निप्रभाज्वाळ । मूर्तिप्रभा प्रबळ प्रकाशे ॥१३॥
मुकुटकुंडलें मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळा ।
आपाद रुळे वनमाळा । झळके गळां कौस्तुभ ॥१४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.