योगिनोऽपक्वयोगस्य, युञ्जतः काय उत्थितैः ।

उपसर्गैर्विहन्येत, तत्रायं विहितो विधिः ॥३८॥

योगी प्रवर्तल्या योगाभ्यासीं । योग संपूर्ण नव्हतां त्यासी ।

उपसर्ग येती छळावयासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥९५॥

शरीरीं एखादा उठे रोग । कां खवळे विषयाची लगबग ।

अथवा सभ्रांत उपसर्ग । कां योगभंग विकल्पें ॥९६॥

ज्ञानाभिमान सबळ उठी । तेणें गुणदोषीं बैसे दिठी ।

परापवादाची चावटी । त्याची एकांतगोष्टी निजगुज ॥९७॥

देहीं शीतळता उभडे । कां उष्णता अत्यंत चढे ।

किंवा वायु अव्हाटीं पडे । कां क्षुधा वाढे अनिवार ॥९८॥

विक्षेप कषाय वोढवती । परदारापरद्रव्यासक्ती ।

इत्यादि उपसर्ग येती । उपाय श्रीपति तदर्थ सांगे ॥९९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel