य एतच्छ्र्द्धया नित्यमव्यग्रः श्रृणुयान्नरः ।

मय भक्तिं परां कुर्वन्, कर्मभिर्न स बध्यते ॥२८॥

असो न करवे अध्ययन । तरी श्रद्धायुक्त सावधान ।

करितां एकादशाचें श्रवण । कर्मबंधन बाधीना ॥५९॥

अति श्रद्धेनें केलें श्रवण । त्याहूनि दृढ व्हावें मनन ।

मननेंवीण तें नपुंसक जाण । ब्रह्मप्राप्ति पूर्ण फळेना ॥४६०॥

संपलिया कथाश्रवण । मनींचें संपावें ना मनन ।

जैसें लोभियाचें धन । हृदयीं आठवण सर्वदा ॥६१॥

जैसें जैसें कीजे श्रवण । तैसें तैसें लागे मनन ।

मननानुसारें भजन । ’पराभक्ती’ जाण उद्बोधे ॥६२॥

आर्त जिज्ञासु अर्थार्थी । यांची सांडोनिया स्थिती ।

उल्हासे माझी चौथी भक्ती । जितें ’परा’ म्हणती सज्ञान ॥६३॥

पराभक्तीचें माझें भजन । क्रियामात्रें निजात्मदर्शन ।

यालागीं मद्भक्तांसी जाण । कर्मबंधन बाधीना ॥६४॥

हें असो अतिगुह्य बोलणें । येणें एकादशाचेनि श्रवणें ।

’मी तरेन’ हा विश्वास जेणें । अंतःकरणें दृढ केला ॥६५॥

दृढ विश्वास मानूनि पाहीं । जो लोधला श्रवणविषयीं ।

माझी भक्ती त्याच्या ठायीं । दवडितां पाहीं घर रिघे ॥६६॥

घर रिघोन भक्ति निष्काम । भक्तांचें निर्दळी सकळ कर्म ।

या नांव ’पराभक्ति’ परम । विश्रामधाम श्रवणार्थ्यां ॥६७॥

एकादशाचें श्रद्धा श्रवण । करितां एवढा लाभ पूर्ण ।

श्रवणें उपजे माझें भजन । भजनें भक्तजन निर्मुक्त ॥६८॥

असो पां इतरांची वार्ता । म्यां तुज निरुपिली जे ज्ञानकथा ।

ते तुझिया निश्चितार्था । काय तत्त्वतां प्रतिबोधली ॥६९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel