ज्योत्स्नेनें नभ व्यापिलें, विश्व माखिलें पयें जणुं चोख
ह्रदयांत भरे काळोख.
नभिं नक्षत्रें चमकती, रत्नमणि किती विखुरले दिसती,
कोळसे तरंगति चित्तीं.
वर्षतो सुधा शीतला, निववि भूतला चंद्र या समयीं,
काळकूट भडके ह्रदयीं.
शीत हा पवन संचरे, सुवासें भरे व्योम हें सारें,
निःश्वास ऊन मी वितरें.
सलिलांत फुले कमलिनी मृदुल जी जनीं, मनीं परि भरती
ते तरंगकंटक रुतती.
प्रियसखी-वियोगामुळें ह्रदय हो खुळे जगाहुनि भिन्न
तें चूर सुखीं, हें खिन्न !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.