जिवलगे, संगिं मम सारा
दुःखाचा मात्र पसारा !
जुंपलिस सदा संसारा,
ठावा न सुखाचा वारा.
सांखळी, सरी, पाटली आणुं कोठली तुझ्या शृंगारा ?
कोठला जिवलगे, शालु तुला मी घालुं ? विसर मणिहारा.
पातळें जरी पैठणी तुला कोठुनी ? नसे यां थारा.
दिनरात्र मात्र काळजी, सदा व्याळि जी ओति विष-धारा.
ह्रदयाहुनि दुसरें काय द्यावया ? हाय ! तेंहि अंगारा !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.