कां रे जाशी मज त्यजुनी ?

तुजसाठीं मीं जनका त्यजिलें, त्यजिली माझी प्रिय जननी.

तुजसाठीं मी स्वसुखा भुललें, जपलें तुजला दिनरजनीं.

विश्वासानें ह्र्दय दिलें हें; कैशी करिशी ही करणी ?

वैभवकालीं जमलिं पांखरे; स्थिर मी, गेलीं तीं उडुनी.

तव सुखदुःखी स्थिर जी अबला त्या मज टाकिशि कां म्हणुनी

धरिली तुझी कांस सख्या; मीं' तनमन अर्पियलें चरणी.

अपराधहि तरि काय असा मम ? लोटिशि मजला तमिं महनीं !

प्रथम पेरिली साखर कैशी ! हा हा ! फसलें तव वचनीं !

कठिण कसें हें ह्रदय तुझें रे ! नाहीं माया काय मनीं ?

निश्चल गिरिसम केवि उभा तूं? जाती माझे असु निघुनी !

प्राणसख्या, का फिरविशि डोळे ? ओढिति असु ते कुडिमधुनी.

फोडुनि पाहीं ह्रदय अधीं हें भरलें प्रेमें किति अजुनी !

ओत, पाज विष ! भीशि कशाला ? याहुनि वधणें काय जनीं ?

तुजवांचुनि मी केवि जगुं जगीं ? बुडविन दुःखा मी मरणीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel