उगिच काय बुल्बुला ऽ, शिणविशी गळा ?

भरुनि तान कोमला बघसि कंटका मला ?

रिझवितोस कां मला ? रुतुनि मात्र कोमला

दगड रिझव जा, तुला तनु करीं न विव्हला-

साधतां कला. पळ ! न हो खुळा.

उगिच कंठ फोडिशी, प्रीतिचा सुके झरा

ह्रदय मात्र फाडिशी, ह्रदयिं; देइं उत्तरा

रमणि-वाणि आणिशी कवण ? जा करीं त्वरा

स्मरणिं मंजुळा ! उडुनि सुस्थळा,

उकलिते इथे कळी उपवनीं जिथे किती

नच गुलाबपाकळी नव गुलाब हासती.

जी धरील ह्रत्स्थळीं दे झराहि हुंकती

गीति कोमला. झुळूझुळू तुला.

मधुर येथली कळी सदन हें स्मशान गा !

कधिंच जाण वाळली, काष्ठ मी, रहा उगा.

चुकलि दृष्टि का खुळी ? भुलुं नको, न येथ गा;

बघशि कां मला ? परत आपुला !

तुझि कट्यार चोच ती,

ह्रदयिं तीव्र खोच ती !

पोचवीं जिथे सती

झणिं सख्या, मला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel