ह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी ?

दे ऽ ! दे न देशि तरी दे तुझें तरी !

नयनिं धूळ घातली

गुंतवोनि कुंतलीं,

दडविलें तिथूनिही हळूच कां उरी ?

मदननृपापासुनी

दाद घेइं लावुनी

बसुनि लोचनांत तुझ्या न्याय जो करी.

मदनमंत्रि चंद्रमा

न्यायबळें कांतिमान्,

अनलधार ओतवीन मी तया करीं.

वसंत कोतवाल हा

सज्ज गे उभा पहा !

कुसुमबाण सोडवीन मी तुझ्या उरीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel