चौघडा झडतो,

झडतो दुमदुमुनी, धडधडे, उर हें कां म्हणुनी ?

सनइ ही घुमते,

घुमते मंजुळ ती, मला कां गमे निधनगीती ?

मधुर या गाती,

गाति वायुवरती; पिशाची क्रीडारत दिसती.

झुलति गज दारीं,

दारीं जरि डौलें गमति कां अवसेचे पुतळे ?

चमकती युवती,

युवति जशा चपला; पिळति कां माझ्या ह्रदयाला ?

उसळली दाटी,

दाटी चौकांत' मला कां भासे एकान्त ?

वधुवरां बघुनी,

बघुनि तोष सकलां; बाळ वर माझें, सुख न मला.

गाति पंक्तीत,

पंक्तिंत 'वरमाय', हा ! कुठें परि ती वर-माय ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel