त्वेषानें घनघोर घर्घररवें गर्जे महासागर,

संदिग्ध ध्वनि दुमदुमे, नगर हें टाकी दणाणोनिया,

जाई दूर दिगंतरा पवनिं हा आरूढ होवोनिया,

वेंची सागर सर्वही बळ कसा फेसाळला हा वर !

याच हा वरचाच गे ध्वनि, परी, हाले जरी अंतर

दावूं केवि शके अगाध ह्रदयीं जें चाललें याचिया ?

ताना या भरल्या कशा तरि सखे, वेड्या तशा वांकड्या

गेहीं या घुमती सदा जरि सखे, संदिग्ध या बेसुर.

जाया दूर दिगंतरा बळ न यां, हा भेद आहे परी,

वेंचीं मी बळ सर्वही, ह्रदय हें न्हाई द्रवानें किती !

हा सारा वरचाच गे ध्वनि, परी हाले जरी अंतरीं

दावूं प्रेम कसें तुझ्याविषयिं जें संदिग्ध या दाविती !

ताना या जरि पवल्या जनन गे प्रेमीं तुझ्याची तरी

घे घे अर्पितसें तुलाच म्हणुनी वारू, प्रिये पार्वती !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel