कळ्याकळ्यांत विहार करिशि तूं कळ्याकळ्यांत विहार ध्रु०

दिसशी तूं बन्सीधर गिरिधर, तुझ्या छबीस न पार सख्या रे ! १

जादु बन्सिचा घुमतां तुझ्या येइ कळ्यांस बहार, फुगति या. २

काय लभ्य उद्दाम भूप मज, करिति फुलांवर प्यार मात्र ते ! ३

नको नको अभिमानि तेहि मज घालिति मुळीं कुठार निर्दयी. ४

मुग्ध कळ्या या मुली तान्हुल्या, पुरविशि कोड अपार बापसा. ५

खेळविशी त्या झेलुनी हातीं, लोभ तुझा अनिवार यांवरी. ६

माळि भिकारी हा पण तूझा लोभचि यावर फार निर्मळ. ७

प्रीतिसूत्रिं गुंफोनि अर्पितों गळां कळ्यांचा हार घे सख्या. ८

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel