शुक्राची मधु चांदणी लखलखे रम्या कुमारी वरी,
प्रतिस्निग्ध सलज्ज हा नयन का आरक्त, नील क्षणीं ?
झाली चंचल वृत्ति, संचर गमे झाला अशा लक्षणीं
वाटे ही रमणी वरोत्सुक असे झाली बहू अंतरीं ?
कोणाकारण ज्योत ही उजळली ठायीं हिच्या अंबरीं ?
कायावाङ्मनसा कुणा ह्रदय ही अर्पी हिच्या अंबरीं ?
शोभे निर्मल नील मंडफ किती भास्वान् वर्हाडी जनीं !
कोणाकारण पूजनीं रत असे गौरीहराच्या तरी ?
प्रीती ही फुलली, अहा उसळला तद्वर्ण सारा नभीं !
झालें 'मंगल सावधान' रविशीं अंतःपटा सारितां,
दावा ती निरखोनिया मज सख्या, कोठे अतां ती उभी ?
झाली लीन पतींत, सागरिं मुरे जैशी नदी भेटता.
आहाहा ! सुखसागरांत मुरलें या मंगलीं त्या दिनीं,
तेव्हांपासुनि पाहिलें मज सख्या, सांगा पृथक् का कुणीं ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.