"तुझ्या गळां

माझ्या गळां

गुंफू मोत्यांच्या माळा-"

"ताई, आणखि कोणाला?"

"चल रे दादा चहाटळा ! १

तुज कंठी

मज अंगठीं !"

"आणखि गो ऽ फ कोणाला ?"

"वेड लागलें दादाला !"

"मला कुणाचें ? ताईला !" २

"तुज पगडी

मज चिरडी !"

"आणखि शेला कोणाला ?"

"दादा, सांगूं बाबांला ?"

"सांग तिकडल्या स्वारीला ! " ३

खुसूं खुसूं

गालिं हसूं-

वरवर अपुले रुसूं रुसूं !"

"चल निघ, येथें नको बसूं"

"घर तर माझें तसू तसू. ४

कशी कशी

आज अशी

गम्मत ताईची खाशी !"

"अतां गडी फू दादाशीं"

"तर मग गट्टी कोणाशीं ?" ५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel