पावलोपावलीं साउलि ही !
पाठिशी सारखी लागलि ही. ध्रु०
कैद्यामागें सक्त पहरा,
त्यावरि करडा राखि दरारा,
या साउलिचा तसा शशिमिरा
लागला, वृत्ति मम कावलि ही. १
टाळूं पाहे तरी टळेना,
हात जोडिले तरी वळेना,
क्षणभर मज एकांत मिळेना,
कोठली पिशाची लागलि ही ! २
बसलों मी, ही पीडा बसली;
उठलों उठली, निजलों निजली;
रडलों रडली, हसलों हसली;
वांकोल्यांची माउली ही ! ३
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.