घाबरूं नको, बावरूं नको !

क्षण भीतीनें गांगरूं नको ! ध्रु०

जरि शत्रूंचा अजस्त्र मारा

उलथुनि पाडी जणुं डोलारा

अभेद्य भक्कम किल्ला सारा,

तरि वीरा 'हूं चूं' करूं नको. १

जरी दिशांचे तट ढासळती,

नभ-सौधाचे स्तंभ कडाडति,

हंड्या झुंबर तडतड पडती,

तरि हे वीरा, डगमगूं नको ! २

जरि धुळीनें डोळे मिटती,

ध्रूम्र-मेघ कंठीं घुरघुरती,

सैरावैरा सैनिक पळती.

तरि रणांगणांतुनि फिरूं नको. ३

निर्वाणीचें काढ सुदर्शन,

तळघरांत जें ठेलें लपवुन,

मार नेम रे अचूक रोखुन,

तूं जयश्रीस अंतरूं नको. ४

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel