कशि काळनागिणी वैरिण झाली नदी ! ध्रु०
प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधीं. १
सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी. २
सुखी पांखरें गात चाललीं पार वादळीं सुधी. ३
पापिण खिळलें तिरा, विरह हा शस्त्राविणें वधी. ४
पैलतटिं न कां तृण मी झालें ? तुडविता तरी पदीं ! ५
पैलतटिं न कां कदंब फुललें ? करिता माळा कधीं. ६
प्राणाचें घे मोल नाविका, लावि पार, ने अधीं ! ७
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.