निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी. ध्रु०

तिचा कलीजा पदरीं निजला,

जिवापलिकडे जपे त्याजला,

कुरवाळुनि चिमण्या राजाला

चुंबी वरचेवरी. १

सटवाई जोखाइ हसविती,

खळीं गोड गालांवरि पडती

त्याचीं स्वप्नें बघुनि मधुर तीं

कौतुकते अंतरीं. २

अशीच असशी त्रिभुवनजननी,

बघत झोपल्या मज का वरुनी ?

सुखदुःखांचीं स्वप्नें बघुनी

कौतुकशी का खरी ? ३

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel