निष्ठुर किति पुरुषांची जात ! ध्रु०
भिरकावित गाईस निसटला हुर्र करित निमिषांत ! १
रवि सोडुनि माठांत निघालें महि घेउनि हातांत. २
वेडि उभी मी लावुनि डोळे वाट बघत दारांत. ३
नजर एकहि न टाकुनि निसटे सांड जसा नादांत ४
ठार करी वेताळ वावटळ वितळुनि जणुं वार्यांत. ५
गाळ्या देता दोन तरी मी जळतें अशि न मनांत ६
परि हें निघणें अनोळख्यापरि विळा बाइ पोटांत ! ७
भेट जरा कुंजांत नदीवर, घेशिल तृण दांतांत ! ८
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.