झिंगत आला तारानाथ.
आल्या मुखरिणि या बाहेर,
चंद्राभोवति धरिती फेर.
फेर धरति या गाउनि आज,
लखलख चमकति लेउनि साज,
अंगणि भरला वरि आनंद,
लीला मचली अंदाधुंद,
गवळणि जमल्या कुरणीं आज,
मुरली घुमवा या महाराज !
शरदाचा हा मादक काळ,
अंगी आला, या गोपाळ,
गाणीं गाऊं घेउनि फेर,
मोरमुगुट शिरिं, या बाहेर.
धवल पिठापरि यमुना-तीर.
लहरी नाचुनि गाई नीर,
खिदळे वारा हा कुंजांत,
डुलती राया, गाई आंत;
विखरी परिमळ हा कुरणांत
मद संचरला दाहि दिशांत.
चंचळ चरणीं नाचूं आज,
मुरली घुमवा या महाराज !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.