श्री .. ची.. कविता : ५
----------------------------------
*प्रेम दे मला प्रिये*
एक सोबतीचा क्षण तुझा
जीवन परिपुर्ण वाटे मला
तुझे हसणे पाहुन माझी गं
मनाची बैचेनता शांत वाटे..
तु सखी तुच माझी प्रिया गं
तु राणी माझी सजणी गं..
तु ही तुच माझी प्रेयसी गं
तुझेच गीत माझ्या ओठी गं..
अनंत तत्व प्रेम हे माझे..
सखे तुझा असा मी प्रियकर.
घेऊन माझा हातात हात गं
घेऊन कर तु मला प्रेमसमर्पण
तु शक्ती तुच माझी प्रेरणा..
तुझेच ध्येय ,ध्यास तुझा जीवना
प्रेमाची एक आस या जीवना
पुर्ण कर तु सखे मला प्रेम देऊन..
===================
तुझा .. श्री...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.