श्री .. ची .कविता- ७
==================
रूप तुझे गं सजणी
या डोळ्यात मावत नाही
सुगंध तुझा असा सजणी
कुठल्या बागेत मिळत नाही
स्पर्श तुझा गं सजणी असा
मोहरते अंगी शहारे माझ्या
तुला भेटायची ओढ अशी की
वाऱ्यालाही हारवुन टाकावे
भेटीचा आनंद ही सजणी की
माझ्या हृद्यातही मावत नाही
आनंद या डोळ्यात सजणी
मावता मावु शकत नाही....
===============≠====
*_तुझा श्री.._*
*कवी :- श्रीधर कुलकर्णी*
====================
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.