दोन बेडूक होते. त्यांपैकी एक तलावात राहात असे व एक तलावाच्या काठी, रस्त्याजवळ राहात असे. एकदा रस्त्यावरचे पाणी, उन्हामुळे आटू लागले. तेव्हा तलावातील बेडकाने दुसर्या बेडकाला आत बोलावले. परंतु तो म्हणाला, 'माझी ही फार दिवसांची जागा मला सोडवत नाही. मी आपला इथेच राहातो.
नंतर काही दिवसांनी तो बेडूक एका गाडीच्या चाकाखाली सापडला आणि मेला.
तात्पर्य
- आळशी लोक मृत्यू जवळ येऊन ठेपला तरी उद्योग करीत नाहीत. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.