एकदा एक करडू बोकडाबरोबर चरत होते. तेव्हा एक लांडगा तेथे आला व करडाला म्हणाला, 'तू असा आपल्या आईला सोडून आलास हे बरं नाही. तिथे तुला पोटभर दूध प्यायला मिळालं असतं. इथे रानात काय मिळणार ? चल, मी तुला आईकडे नेतो.' करडू म्हणाले, 'माझं रक्षण करण्यासाठीच आईनं मला या बोकडाबरोबर पाठविलं आहे. त्याच्यापासून दूर नेऊन तू मला खाशील. तू निश्चितच लबाडीचं बोलतो आहेस, हे मला कळतं आहे !'
तात्पर्य
- फसवणारा कितीही गोड बोलला तरी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.